शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली सापडून हवालदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:31 IST

अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार अनिल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सटाणा : अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार अनिल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भाक्षी रोडवरील शरदनगरचे रहिवासी व मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल बन्सीलाल अहिरे (३९) हे आपल्या कर्तव्यावरून बुलेट मोटरसायकलने (एमएच ४१-९४४५) रात्री मालेगाव येथून सटाण्याकडे परतीच्या मार्गावर असताना जुनी शेमळीनजीक येणाºया टॅÑक्टरने समोरून जबर धडक दिल्याने अहिरे दुचाकीसह ट्रॅक्टरखाली सापडले. त्यांचे डोके चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. टॅÑक्टरचालक मात्र पसार झाला आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, नंदू पगार, मनसेचे पंकज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अहिरे यांना तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.  घटनेचे वृत्त कळताच अहिरे यांचे नातेवाईक, मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिरे यांच्या अपघाती निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल अहिरे यांच्या पश्चात त्यांचे वडील सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक बन्सीलाल अहिरे, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कारपोलीस हवालदार अहिरे हे मूळ देवळा तालुक्यातील वासोळ येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि. २०) दुपारीयेथील ताहाराबाद रस्त्यावरील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तीन फैरी झाडून अहिरे यांना मानवंदना दिली. यावेळी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपनिरीक्षक गणेश बुवा, कृष्णा घायवट, पुंडलिक डांबाळे, संदीप गांगुर्डे यांच्यासह नगराध्यक्ष सुनील मोरे आदींनी श्रद्धांजली  अर्पण केली.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात