जिल्ह्यात सध्या ४१२१ कोविड बेड्स रिक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:32+5:302020-12-04T04:39:32+5:30
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्या ऑक्टोबरपासून घटू लागल्याने कोविड आरक्षित बेड्स शिल्लक राहण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गत दोन ...

जिल्ह्यात सध्या ४१२१ कोविड बेड्स रिक्त !
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्या ऑक्टोबरपासून घटू लागल्याने कोविड आरक्षित बेड्स शिल्लक राहण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गत दोन महिन्यांत ही संख्या सातत्याने वाढत गेली आहे. सध्या जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कोविड सेंटरमधील तब्बल ४,१२१ बेड्स रिक्त आहेत.
जगातील काही अन्य देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी नाशिकसह महाराष्ट्रात कुठेही दुसरी वेगवान लाट आल्याचे वृत्त नाही. तसेच त्या प्रमाणात रुग्णवाढ होतानादेखील दिसून येत नाही. तरीदेखील जिल्हा प्रशासन कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे. त्यात जिल्ह्यातील शासकीय २,९०८ खाटा कोरोनासाठी उपलब्ध असून त्यातील २,६५० रिक्त आहेत. त्याशिवाय नाशिकसह अन्य नगरपालिका आणि परिघातील खासगी रुग्णालयांमध्ये असलेल्या १,४७१ खाटा या रिक्त असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली तरी प्रशासन त्यावर मात करू शकेल, असा जिल्हा प्रशासनाला विश्वास वाटत आहे.
रुग्णालयांतील स्थिती
एकूण बेड्स - ४,६७९
व्हेंटिलेटर्स-५००
कोट
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय फरक पडलेला आहे. मात्र, दिवाळीपूर्वी २,५००पेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या आता पुन्हा वाढून ३,००० पेक्षा अधिक झाली आहे. जिल्ह्यातील एकूण खाटांपैकी केवळ ३० टक्के खाटांवरच रुग्ण आहेत. मात्र, कोरोना संपुष्टात आला नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
दिनांक एकूण रुग्ण नवीन रुग्ण बरे झालेले रुग्ण
२९ नोव्हेंबर-२९६६ ३४२ २०७
३० नोव्हेंबर-२७९० ३६७ ५३८
०१ डिसेंबर-२८३३ २८२ २३२
०२ डिसेंबर-३०२२ ४०३ २०८
०३ डिसेंबर -