शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दहावीच्या निकालाची उत्सुकता; शनिवारी शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:41 AM

नाशिक : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियावर पंधरा दिवसांपूर्वीच ६ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची पोस्ट फिरत असल्याने पालकांना सहा तारखेची प्रतीक्षा होती. परंतु याबाबतची कोणतीही माहिती राज्य मंडळाकडून प्राप्त झाली नसल्याने निकाल नेमका कधी लागणार याबाबतची अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अद्याप दोन विभागीय मंडळांच्या निकालाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे.

ठळक मुद्देदि. ८ किंवा ९ रोजी निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

नाशिक : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सोशल मीडियावर पंधरा दिवसांपूर्वीच ६ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची पोस्ट फिरत असल्याने पालकांना सहा तारखेची प्रतीक्षा होती. परंतु याबाबतची कोणतीही माहिती राज्य मंडळाकडून प्राप्त झाली नसल्याने निकाल नेमका कधी लागणार याबाबतची अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अद्याप दोन विभागीय मंडळांच्या निकालाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब होत आहे.इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सीईटी आणि नीट परीक्षांचेदेखील निकाल हाती आले आहेत. निकालाच्या या हंगामात दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. ६ जून रोजी निकाल जाहीर होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर यापूर्वीच फिरत असल्याने मुलांना सहा तारखेची प्रतीक्षा होती. विशेष म्हणजे बारावी परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर होण्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यानुसार निकालही जाहीर झाला. त्याचवेळी दहावीचा निकाल ६ जून रोजी जाहीर होणार असल्याचीदेखील पोस्ट फिरत होती. त्यामुळे दहावीचा निकालदेखील सहा तारखेलाच जाहीर होण्याची दाट शक्यता गृहीत धरून पालक आणि विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते.

प्रतीक्षा कायम

दहावीचा निकाल नेमका कधी आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक विभागीय मंडळ तसेच प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात भ्रमणध्वनी करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. निकालाच्या तारखेबाबत राज्य मंडळाकडून सायंकाळपर्यंत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसल्याने निकालाच्या प्रतीक्षेत मुलांना दिवस घालवावा लागला. दरम्यान, दि. ८ किंवा ९ रोजी निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.