शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राष्टवादीच्या नव्या प्रभारीबद्दल उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:21 IST

राष्टवादी कॉँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नवीन पक्ष प्रभारी कोण? याबद्दल राष्टवादीत उत्सुकता निर्माण झाली असून, दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीच्या नेतृत्वात झालेल्या फेरबदलात पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी पक्षाची धुरा तरुणांच्या हाती सोपविण्याचे संकेत दिल्यामुळे राष्टवादीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदासाठी सुनील वाजे, प्रकाश वडजे या इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

नाशिक : राष्टवादी कॉँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नवीन पक्ष प्रभारी कोण? याबद्दल राष्टÑवादीत उत्सुकता निर्माण झाली असून, दुसरीकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादीच्या नेतृत्वात झालेल्या फेरबदलात पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांनी पक्षाची धुरा तरुणांच्या हाती सोपविण्याचे संकेत दिल्यामुळे राष्टवादीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदासाठी सुनील वाजे, प्रकाश वडजे या इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  राष्टवादीच्या नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करताना अजित पवार यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनेच्या काळाचा उल्लेख केला. शरद पवार यांनी पक्ष स्थापन करताना तरुणांना पक्ष संघटनेत व सत्तेत अधिकाधिक संधी दिल्याने पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला होता याची आठवण अजित पवार यांनी करून दिली, त्याचाच धागा पकडून खुद्द शरद पवार यांनीदेखील देशापुढील प्रश्न व समस्या पाहता पक्ष संघटनेची सूत्रे आगामी काळात तरुणांच्या हाती देण्याची गरज बोलून दाखविली. पक्ष हा वीस वर्षांच्या तरुणासारखा असावा त्यासाठी पक्षाच्या वाटचालीसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्या, परंतु सूत्रे मात्र तरुणांच्या हाती सोपवा, नवीन नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील पक्षाच्या रचनेत तरुणांना संधी देण्याचे सुतोवाच केले आहे. पक्षाच्या नेत्यांचा तरुण नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षांचा विचार करता होऊ घातलेल्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी श्रीराम शेटे, रवींद्र पगार, प्रकाश वडजे, सुुनील वाजे, सचिन पिंगळे आदींनी पक्षाकडे इच्छा प्रदर्शित केली असून, प्रदेशाध्यक्षांची निवडीचा सोपस्कार पार पडल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत नवीन जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे.  त्यापार्श्वभूमीवर रविवारी सुनील वाजे यांनी पक्षाचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन आपली इच्छा बोलून दाखविली.  राष्टवादीचे नवीन जिल्हा प्रभारी कोण? याविषयी उत्सुकता निर्माण झाली असून, आमदार जितेंद्र आव्हाड, महेश तपासे यांची नावे त्यासाठी घेतली जात आहेत. आव्हाड यांचे स्वत: नाशिक जिल्ह्याशी जवळचे संबंध असून, यापूर्वी त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे प्रभारी पद येऊ शकते, तर राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष महेश तपासे यांच्याही नावाची चर्चा केली जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस