विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST2021-05-31T04:12:27+5:302021-05-31T04:12:27+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिलासादायक वाढ ...

विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर !
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात दिलासादायक वाढ झाली असून, हे प्रमाण ९५.१९ टक्क्यांवर आहे. तर मृत्यूदर १.३५ टक्के आहे.
विभागातून आजपर्यंत ८ लाख ६६ हजार २८७ रुग्णांपैकी ८ लाख २४ हजार ६९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २९ हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ११ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभाग, नाशिक परिमंडल कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली.
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ३६ लाख ६१ हजार ३४९ अहवाल पाठविण्यात आले असून, त्यापैकी ८ लाख ६६ हजार २८७ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली.
इन्फो
नाशिकला प्रमाण ९६.०६ टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८४ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३ लाख ६९ हजार ६५२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के इतके आहे. आजपर्यंत ४ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.२० टक्के आहे.
इन्फो
अन्य जिल्ह्यांपैकी धुळ्यात सर्वाधिक
नगर जिल्ह्यात सध्या ११ हजार ६२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ३ हजार ११२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.१९ टक्के आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या बाधितांचे प्रमाण ९६.३६ टक्के आहे. आजपर्यंत ६६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.५७ टक्के आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ६६६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १ लाख ३० हजार ९५१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार १९१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७६ टक्के आहे. आजपर्यंत २ हजार ५३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर १.८० टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के आहे. नंदुरबारला आतापर्यंत ३९ हजार ९६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ३८ हजार ४८८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६१३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्ह्याचा मृत्यूदर २.०५ टक्के आहे.