ब्रह्मोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

By Admin | Updated: October 18, 2015 23:06 IST2015-10-18T23:04:51+5:302015-10-18T23:06:22+5:30

ब्रह्मोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

Cultural Programs in Brahmasotsava | ब्रह्मोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

ब्रह्मोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक : संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम. कापडपेठेतील बालाजी मंदिरात सुरू असलेल्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात शुक्रवार (दि. १६) बालाजी संगीत सेवेतर्फे ‘परंपरा’ हा स्वर-ताल आणि नृत्याची अनोखी पेशकश असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यंकटेश वंदना, कथ्थक, तबला, गायन, हार्मोनिअमच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. व्यंकटेश वंदनाचे सादरीकरण ध्रुव बालाजीवाले, अवनीश अत्रे आणि यश देशपांडे यांनी केले, तर मानसी केळकर, ऐश्वर्या जोशी, वृषाली गोसावी, शुभलक्ष्मी बालाजीवाले यांनी कथ्थकचे सादरीकरण केले. अथर्व वारे, अद्वय पवार, राधिका रत्नपारखी, वैष्णवी भडकमकर यांच्या तबला वादनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आरोह ओक, अजिंक्य जोशी, पूजा दीक्षित, मधुली मुतालिक यांनी गाण्यांचे सादरीकरण केले, ईश्वरी दसककर हिने संवादिनीवर साथसंगत दिली. या सोहळ्याला नाशिक शहर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, माजी नगरसेवक शाहू खैरे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्र माचे निवेदन मल्हार मुतालिक, शिर्वका जोशी, श्रीया आपटे आणि सार्थक उपासनी यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Cultural Programs in Brahmasotsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.