आनंद मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यक्रम
By Admin | Updated: January 14, 2017 00:29 IST2017-01-14T00:28:57+5:302017-01-14T00:29:08+5:30
आनंद मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यक्रम

आनंद मेळाव्यासह सांस्कृतिक कार्यक्रम
कळवण : मविप्र संचलित बेज येथील अभिनव बालविकास मंदिर, महात्मा फुले विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येऊन आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्र म झाले. विद्यार्थी प्रवेशद्वाराजवळ उभे राहून ‘काका, मावशी खाऊची खरेदी आमच्या शाळेतून करा’ असा आवाज देत होती. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नेमका काय उपक्र म राबविला आहे हे पाहण्यासाठी गेलेला प्रत्येक जण हातात खाऊ घेऊन आनंदाने बाहेर पडत होता. मुख्याध्यापक बी. डी. रौंदळ, बी. आर. सागर, विलास शेवाळे, कैलास हिरे, जयदत्त लाडे, गुरू गावित, राज सरकार, भोये, ऊर्मिला अहेर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खरेदी-विक्र ीचे व्यावहारिक ज्ञान व्हावे, ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून अभिनव बालविकास मंदिर, महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘खाऊ गल्लीची’ संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली.
विद्यार्थ्यांनी भरविलेल्या बाजारात पाववडे, सॅण्डविच, इडली सांबार, लाडू बट्टी, आप्पे, पोहे, भेळभत्ता, गुडीशेव, पाणीपुरी, चिवडा, झुणका भाकर, चॉकलेट यांसारख्या खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती.
यावेळी कृष्णाजी बच्छाव, भिकाजी बच्छाव, दशरथ बच्छाव, प्रभाकर निकम, प्रल्हाद देवरे, विनोद खैरनार, नितीन पाटील, देवीदास जाधव, नितीन मोगरे, शांताराम जाधव, प्रतीक शिंदे आदि पालक उपस्थित होते. मीरा अहेर, क्र ांती देवरे, हिरामण झिरवाळ, हिरे, वाघ आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)