वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:33 IST2020-01-05T23:33:17+5:302020-01-05T23:33:36+5:30

रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक व प्रायमरी इंग्लिश मीडिअम स्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव लोंढे होते. वंदना निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

Cultural events at the annual concert | वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम

कुकाणे येथे स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्याथिॅनी.

ठळक मुद्देकुकाणे : सावित्रीबाई फुले माध्यमिक व प्रायमरी स्कूल

कुकाणे : येथील रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक व प्रायमरी इंग्लिश मीडिअम स्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव लोंढे होते. वंदना निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यालयाची परंपरा व ग्रामीण भागांमध्ये केलेले कार्य हे गौरवास्पद असल्याचे सांगितले. कादवा विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष के. के. आहिरे यांचेही भाषण झाले. यावेळी मावडीचे प्राचार्य अशोक काळे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी मोहिते, प्राचार्य पी. पी. पाटील, सुवर्णसिंग ठोके , शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विभागीय प्रमुख संग्राम करंजकर, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले. आभार राजेंद्र लोंढे यांनी मानले.
भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक पवार यांनी पालक, विद्यार्थ्यांंचे कौतुक केले. विद्यालयातून आरटीओ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली
अरु णा लहामगे या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. परिसरातील गावातील पालक-विद्यार्थी व ग्रामस्थांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद घेतला.

Web Title: Cultural events at the annual concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.