शेतीच्या वादातून चुलत भावाला मारहाण
By Admin | Updated: April 18, 2015 23:43 IST2015-04-18T23:40:18+5:302015-04-18T23:43:51+5:30
शेतीच्या वादातून चुलत भावाला मारहाण

शेतीच्या वादातून चुलत भावाला मारहाण
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तालुक्यातील नात्याने चुलत भाऊ असलेल्या दोन कुटुंबांपैकी एका कुटुंबातील भावांनी दुसऱ्या कुटुंबावर रात्री हल्ला करून फायरटने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने दहशत निर्माण केल्याने कोणी सोडविण्यासदेखील गेले नाही. त्यांना मारहाण करून एकास जखमी अवस्थेत टाकून पळून गेले. अशा आशयाची फिर्याद बाबू रावजी भास्कर (रा. ब्राह्मणवाडे)यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री आम्ही आमच्या घरात बसलो असताना एकाएकी घरात शिरून मारहाण केली़आरोपी पांडू लहानू भारस्कर, पुंडलिक लहानू भारस्कर, त्र्यंबक पांडू भारस्कर व समाधान पांडू भारस्कर सर्व रा. ब्राह्मणवाडे मात्र त्र्यंबक आणि समाधान हे सध्या नाशिक येथे राहतात. चार संशयित आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली असून नाशिक येथील आरोपी सापडत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतीवरून कुरापत काढून डोक्यात जबर मारहाण केली तसेच लाथाबुकक्यानेही मारल्याचे पोलिसांनी सांगितले. त्र्यंबक पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)