ओबीसी आरक्षणासाठी आक्रोश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:09+5:302021-07-19T04:11:09+5:30

महाराष्ट्रातील ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, मालेगाव, जळगाव या जिल्ह्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या उपस्थितीत ...

Cry for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी आक्रोश करा

ओबीसी आरक्षणासाठी आक्रोश करा

महाराष्ट्रातील ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, मालेगाव, जळगाव या जिल्ह्यांचे अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या उपस्थितीत विभागीय बैठक मोरेनगर येथेे खा. डॉ. सुभाष भामरे व बागलाणचे आ. दिलीप बोरसे यांच्या सहकार्याने झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना टिळेकर बोलत होते.

ओबीसी आरक्षण ही राज्यांचीच जबाबदारी आहे. कारण हे आरक्षण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहे. मात्र, राज्य आपली जबाबदारी झटकून ओबीसी बांधवांचा विश्वासघात करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाला सुरुवात करून समाजाला मुख्य प्रवाहात आणले होते. मात्र आज सरकार हे आरक्षण काढत असल्याचा आरोपही टिळेकर यांनी केला. प्रास्ताविक नगरसेवक महेश देवरे यांनी केले, तर आभार हिरामण गवळी यांनी मानले. व्यासपीठावर जि.प. सदस्या मीना मोरे, प्रदेश सरचिटणीस शंकराव वाघ, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पवार, दिलीप खैरनार, नरेंद्र बागूल, किशोर कोठावदे, दिनेश अहिरे, संदीप पवार, रूपाली पंडित आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

वेळीच धोका ओळखा

आता राजकीय आरक्षण काढले तर पुढे शैक्षणिक आरक्षण काढतील, त्यानंतर नोकरीचेही आरक्षण काढतील. हा धोका रोखण्यासाठी एकत्र येऊन सरकार विरोधात आक्रोश निर्माण करण्याची गरज असल्याचे टिळेकर यांनी सांगितले. यावेळी बापूसाहेब घडामोडी व भाजप तालुकाध्यक्ष संजय देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

फोटो- १८ सटाणा ओबीसी

ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर. समवेत पदाधिकारी.

180721\18nsk_19_18072021_13.jpg

फोटो- १८ सटाणा ओबीसी ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर. समवेत पदाधिकारी. 

Web Title: Cry for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.