कुरापत काढून तरुणास मारहाण
By Admin | Updated: March 27, 2016 23:19 IST2016-03-27T23:01:53+5:302016-03-27T23:19:14+5:30
कुरापत काढून तरुणास मारहाण

कुरापत काढून तरुणास मारहाण
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून चौघा संशयितांनी एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना आनंदवलीतील माळीवाड्यात शनिवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास घडली़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय माधव लोणकर (१८) यास दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास संशयित महेश उर्फ अक्षय जोशी, संदीप कोदे, दीपक शेवरे व राहुल गायकवाड या चौघांनी मागील भांडणाची कुरापत काढून बेदम मारहाण केली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात या चौघा संशयितांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कारची काच फोडून
लॅपटॉपची चोरी
गंगापूर रोडवरील एका हॉटेलशेजारील उभ्या असलेल्या कारच्या दरवाजाची काच फोडून लॅपटॉपसह किमती ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२५) रात्रीच्या सुमारास घडली़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील सचिन अरुण चौधरी (३५, रेंजर आयलॅण्ड, पिंपळे सौदागर) हे नाशिकला आले होते़ त्यांनी आपली स्विफ्ट कार (एमएच १८, व्ही ३८७) ही हॉटेल चिलीशेजारी उभी केली असता रात्री साडेदहा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या कारच्या डाव्या बाजूची दरवाजाची काच तोडून एचपी कंपनीचा लॅपटॉप, सोनी कंपनीचा कारटेप व सहा पेन ड्राईव्ह असा ४९ हजार २०० रुपयांचा रुपयांचा ऐवज चोरून नेला़
दरम्यान, दुसऱ्या घटनेत गंगापूर रोडवर उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह हजारो रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२५) घडली आह़े कॉलेजरोडवरील रहिवासी भाग्येश प्रमोद कुलकर्णी यांनी आपली फोर्ड आयकॉन कार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास चोपडा लॉन्सच्या गेटजवळ उभी केली होती़ रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते कारजवळ आले असता कारच्या मागील बाजूची काच फोडून चोरट्यांनी डेल कंपनीचा लॅपटॉप असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ (प्रतिनिधी)