कुरापत काढून मारहाण
By Admin | Updated: July 23, 2016 01:24 IST2016-07-23T01:20:48+5:302016-07-23T01:24:16+5:30
कुरापत काढून मारहाण

कुरापत काढून मारहाण
नाशिकरोड : भांडणात सोडवासोडव का केली या कारणावरून युवकास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेहेडी शिव श्रमिकनगर येथे राहणारा किशोर नंदू उघडे (वय २२) याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या गुरुवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास चेहेडी शिव येथे योगेश अष्टेकर, भारत अष्टेकर, नवनाथ सोनवणे यांनी भांडणात सोडवासोडव का केली या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ करून मारहाण केली. योगेश अष्टेकर याने लाकडी दांडुक्याने मारून जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)