कुरापत काढून बसचालकास मारहाण
By Admin | Updated: September 17, 2016 22:34 IST2016-09-17T22:33:33+5:302016-09-17T22:34:16+5:30
कुरापत काढून बसचालकास मारहाण

कुरापत काढून बसचालकास मारहाण
देवळा : तालुक्यातील लोहोणेर येथे एसटी बस थांबवत नाही, अशी कुरापत काढून बसचालकास मारहाण केल्याची घटना घडल्याने देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.दि. ६ सप्टेंबर रोजी १२ वाजेच्या सुमारास सटाणा आगाराचे
बसचालक मधुकर परशराम निकम यांनी सटाणा-नाशिक बस (क्र .एमएच १२ ईएफ ६७५३) ही बस लोहोणेर येथे बस थांब्यावर थांबवली असता प्रशांत देशमुख (पूर्ण नाव माहीत नाही) या इसमाने चालकाच्या केबिनजवळील दरवाजा उघडून चालक मधुकर निकम यांच्या शर्टची कॉलर पकडून तू नेहमी लोहोणेरला बस थांबवत नाही.प्रवासी घेत नाही असे म्हणून चालकास शिवीगाळ व मारहाण केली, तशी तक्रार निकम यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली असून, संशयित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.