शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'सीआरपीएफ'चे कमांडो रवींद्र सहारे यांचे नाशिकमध्ये अपघाती निधन

By अझहर शेख | Updated: December 6, 2023 15:23 IST

सीआरपीएफचे-रवींद्र सहारे हे  नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते.

नाशिक : केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे (४२,रा.मुळ, कुळवंडी गाव, ता.पेठ) यांचे मंगळवारी हरसूलजवळील पालीफाटा येथे अपघातात निधन झाले. त्यांच्या अशा अपघाती निधनाने नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

सीआरपीएफचे-रवींद्र सहारे हे  नाशिकच्या हरसूलजवळ पेठ तालुक्यात येणाऱ्या मुळ कुळवंडी गावचे भुमीपुत्र होते. ते मागील अनेक वर्षांपासून सीआपीएफमध्ये कर्तव्यावर राहून देशसेवा बजावत होते. अलीकडेच त्यांना पदोन्नती मिळाल्याने कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण होते. त्यांचे वडील राजाराम सहारे हे शेतकरी असून रवींद्र सहारे हे त्यांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन शाळकरी मुले असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधनाने हरसुलसह संपुर्ण पेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. ते दोन ते तीन दिवसांसाठी जम्मु-काश्मिर येथून राहत्या घरी कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले होते.

वर्षभरानंतर ते सीआरपीएफच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. तत्पुर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. मंगळवारी हरसूल गावातून ते दुचाकीने दोघा ओळखीच्या लोकांसोबत संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुळवंडी गावाकडे जात होते. यावेळी मुख्य रस्त्यावरील पालीफाटा याठिकाणी एका भरधाव जाणाऱ्या टाटा सुमो जीपने धडक दिली. या धडकेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना हरसूल ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्यासोबत असलेल्या दोघा इसमांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक गणेश म्हस्के यांनी सांगितले.

घटनास्थळाहून अपघातग्रस्त सुमो कार सोडून चालक फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे म्हस्के म्हणाले. सहारे यांच्या अपघाती निधनाबाबतची माहिती त्यांच्या सीआरपीएफच्या पुलवामा येथील युनिटला कळविण्यात आली होती. मुंबई येथून त्यांच्या दलाचे एक पथक अंत्यसंस्कारासाठी हरसूल गावात दाखल होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांच्या मुळ गावी कुळवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती म्हस्के यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात