कोकाटेंच्या पंचतारांकित विवाह सोहळ्यात वऱ्हाडींची तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST2021-07-02T04:11:32+5:302021-07-02T04:11:32+5:30

चौकट==== बंधने पाळण्याचा प्रयत्न केला दोन कुटुंबातील हा विवाह सोहळा होता. परंतु तो वैदिक पद्धतीने व्हावा, असा आग्रह आमचे ...

Crowds of brides at Kokate's five-star wedding | कोकाटेंच्या पंचतारांकित विवाह सोहळ्यात वऱ्हाडींची तुडुंब गर्दी

कोकाटेंच्या पंचतारांकित विवाह सोहळ्यात वऱ्हाडींची तुडुंब गर्दी

चौकट====

बंधने पाळण्याचा प्रयत्न केला

दोन कुटुंबातील हा विवाह सोहळा होता. परंतु तो वैदिक पद्धतीने व्हावा, असा आग्रह आमचे संबंधी वानखेडे यांनी धरल्यामुळे त्यांचा मान ठेवण्यात आला. आमच्या प्रेमापोटी राज्याचे मंत्री, लोकप्रतिनिधींची गर्दी केली असली तरी, कोरोनाचे सर्व बंधने पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. मात्र काहींनी त्याचे उल्लंघन केले, मास्क वापरले नाहीत हे नाकारून चालणार नाही.

- माणिकराव कोकाटे, आमदार

--------

कोरोना नियमांतून कोणालाच सूट नाही

लग्न साेहळ्यात आपल्या समोर साऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन केले होते. आपल्यानंतर कोरोना नियमांचे पालन झाले नसेल तर ते चुकीचेच आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या प्रेमापोटी लोक गर्दी करतात. याचा अर्थ कोणालाच कोरोना नियमांतून सूट देण्यात आलेली नाही. पुण्यात माझ्या कार्यक्रमात गर्दी झाली तेव्हा गुन्हे दाखल झालेच आहेत.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Crowds of brides at Kokate's five-star wedding