शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

रेल्वेस्थानकावर गर्दी

By admin | Updated: September 13, 2015 23:28 IST

परतीचा प्रवास : चारशेहून अधिक बस फेऱ्या

नाशिकरोड : सिंहस्थ-कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीनिमित्त शनिवार पासुन रेल्वे व पुणे बाजुकडून रस्ता मार्गे जवळपास तीन लाख भाविक शहरात दाखल झाले होते. स्नान आटोपल्यानंतर पुन्हा लाखो भाविकांनी परतीचा मार्ग धरल्याने रेल्वे स्थानक परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. नाशिक-पुणे महामार्ग व रेल्वे स्थानकाकडे जाणारे नाशिकरोडमधील रस्त्यावर दिवसभर परतीच्या भाविकांची व वाहनांचीच रेलचेल होती.कुंभमेळ्यात अमावस्येला असलेली व भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली दुसऱ्या पर्वणीच्या शाही स्नानासाठी रेल्वे व पुणे बाजुकडून रस्ता मार्गे शनिवारपासुन शहरात जवळपास तीन लाख भाविक दाखल झाले होते. लांब पल्ल्याच्या रेल्वेने रविवारी पहाटेपर्यंत हजारो भाविक दाखल झाले होते. मात्र सकाळनंतर आलेल्या रेल्वेला भाविकांची जास्त गर्दी नव्हती. तर चिंचोली नाका बाह्य स्थानक आवारात मोठ्या खाजगी ट्रॅव्हलच्या बसेस, छोटी-मोठी हजारो वाहने भाविकांनी वाहनतळावर उभी करून तेथुन बसने भाविक काठे गल्ली त्रिकोणी गार्डन पर्यंत शाही स्नानासाठी जात होते. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत भाविकांना शाही स्नानास सोडण्यासाठी बसेसच्या ४०० हुन अधिक फेऱ्या झाल्या होत्या. तर रेल्वे मार्गे आलेल्या प्रवाशांना सिन्नरफाटा येथुन शहरात सोडण्यासाठी बसेसच्या ६०० अधिक फेऱ्या झाल्यात. तर शनिवारी मध्यरात्रीपर्यंत रस्तामार्गे भाविकांची सर्व वाहने शहरात दाखल होत होती. फक्त खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चिंचोली नाका बाह्य बस स्थानकांवर पार्किंग करण्यात येत होत्या. त्यामुळे खाजगी वाहनांची देखील गेल्या दोन दिवसांत हजारो भाविक शहरात दाखल झाले होते. मात्र शनिवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली नाका बाह्य बसस्थानक येथे नाशिक एमएच १५ ची वाहने वगळता इतर ठिकाणच्या भाविकांची वाहने शहरात सोडण्यास बंदी घातली होती. तर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ४ जवळील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी असलेल्या बस स्थानकांवरून शनिवारी मध्यरात्री पासुन बसेसच्या १२५ हुन अधिक फेऱ्या झाल्या होत्या. रविवारी पहाटेपासुन सायंकाळी उशिरापर्यंत नाशिक-पुणे महामार्ग व नाशिकरोड परिसरातुन रेल्वे स्थानक, देवळालीगांव, मालधक्काकडे जाणारे रस्ते भाविक व वाहनांनी फुलून गेले होते. भाविक व वाहनांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी सोडविता-सोडविता पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांना नाकीनव आले होते. (प्रतिनिधी)