धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:10 IST2017-08-03T23:42:59+5:302017-08-04T00:10:31+5:30
कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाबरोबर येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
कनाशी : कळवण तालुक्यातील चणकापूर धरणाबरोबर येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे येथे सुट्टीच्या दिवशी पर्यटक हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तसेच चणकापूर
धरण परिसरात निसर्गाने मुक्त हस्ते नैसर्गिक उधळण केली आहे. पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य अजून खुलते. या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत
आहेत.