बेलगाव तऱ्हाळे येथे दुसऱ्या डोससाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST2021-07-31T04:14:45+5:302021-07-31T04:14:45+5:30

धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीतर्फे दुसरे कोविशिल्ड लसीकरण शिबिर बेलगाव येथे संपन्न झाले. यावेळी ...

Crowd for the second dose at Belgaum Tarhale | बेलगाव तऱ्हाळे येथे दुसऱ्या डोससाठी गर्दी

बेलगाव तऱ्हाळे येथे दुसऱ्या डोससाठी गर्दी

धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीतर्फे दुसरे कोविशिल्ड लसीकरण शिबिर बेलगाव येथे संपन्न झाले. यावेळी नागरिकांनी रांगेत उभे राहत लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बेलगाव तऱ्हाळे येथील जवळपास २१४ नागरिकांनी कोविशिल्ड दुसऱ्या व पहिल्या लसीकरण डोसचा लाभ घेतला. यावेळी सरपंच अशोक मोरे, उपसरपंच सुवर्णा आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, प्रमिला वारुंगसे, सुशीला तातले, अंकुश मोरे, बबाबाई मोरे, योगेश तातले, भरत वारुंगसे, धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वेडे, डॉ. प्रतिभा खोब्रागडे उपस्थित होते.

------------------------

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे येथे लसीकरण मोहिमेत सहभागी झालेले धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वेढे. समवेत माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, सरपंच अशोक मोरे व इतर कर्मचारी. (३० नांदूरवैद्य १)

300721\30nsk_1_30072021_13.jpg

३० नांदूरवैद्य १

Web Title: Crowd for the second dose at Belgaum Tarhale