पांडवलेण्यावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST2020-12-16T04:30:59+5:302020-12-16T04:30:59+5:30

नाशिक: शहरातील निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तपोवनात पहाटे फिरणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. शांत परिसरात तसेच पक्ष्यांच्या ...

Crowd at Pandavale | पांडवलेण्यावर गर्दी

पांडवलेण्यावर गर्दी

नाशिक: शहरातील निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तपोवनात पहाटे फिरणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. शांत परिसरात तसेच पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसन्न झालेल्या वातावरणात अनेक लोक या ठिकाणी योगादेखील करतात.

फाळके स्मारकजवळ अतिक्रमण

नाशिक: फाळके स्मारक येथे वाढलेले अतिक्रमण पुरातत्व विभागाकडून काढून टाकण्यात आले. पुरातत्व विभागाच्या नियमानुसाार लेण्याचा परिसर हा सुरक्षित करण्यात आलेला असल्याने या ठिकाणी अतिक्रमण करण्यास मनाई आहे.

वाघ तंत्रनिकेतनमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन

नाशिक: के.के. वाघ शिक्षणसंस्था संचालित तंत्रनिकेतनतर्फे येत्या शुक्रवार आणि शनिवारी राज्यस्तरीय ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धकांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतुकीला अडथळा

नाशिक: पहाटे शहरात धुके असल्याने जेलरोड, लोखंडेमळा तसेच नारायणबापू चौक परिसरात वाहनधारकांचा गोंधळ उडाला. येथील चौकाला वळसा मारताना अनेक वाहनांचा अपघात थोडक्यात बचावला. चारही बाजूंनी वाहने आल्याने वाहतुकीला अडथळा झाला.

Web Title: Crowd at Pandavale