संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरांत गर्दी

By Admin | Updated: August 3, 2015 23:38 IST2015-08-03T23:36:54+5:302015-08-03T23:38:38+5:30

संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरांत गर्दी

The crowd gathered in the temple for the fourth anniversary | संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरांत गर्दी

संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरांत गर्दी

नाशिक : संकष्टी चतुर्थीनिमित्त शहरातील गणेश मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यानिमित्त काही मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर, भद्रकाली येथील साक्षी गणेश, पंचवटीतील सिद्धिविनायक मंदिर, अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपती, गंगापूररोड येथील नवश्या गणपती, स्वामीनगर येथील गणेश मंदिरासह जुने नाशिक, सिडको परिसरातील मंदिरांत सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. अनेकांनी श्रीफळ वाढवत प्रसादवाटप केले. यानिमित्त मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, अनेकांना उपवास असल्याने फळे व उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती.नाशिक : संकष्टी चतुर्थीनिमित्त शहरातील गणेश मंदिरांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यानिमित्त काही मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर, भद्रकाली येथील साक्षी गणेश, पंचवटीतील सिद्धिविनायक मंदिर, अशोकस्तंभ येथील ढोल्या गणपती, गंगापूररोड येथील नवश्या गणपती, स्वामीनगर येथील गणेश मंदिरासह जुने नाशिक, सिडको परिसरातील मंदिरांत सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. अनेकांनी श्रीफळ वाढवत प्रसादवाटप केले. यानिमित्त मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, अनेकांना उपवास असल्याने फळे व उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती.
वक्रतुंड महाकाय...

Web Title: The crowd gathered in the temple for the fourth anniversary