स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:30 IST2018-03-20T00:30:29+5:302018-03-20T00:30:29+5:30
श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंदिरे आणि केंद्रांवर भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने स्वामी चरित्राचे पारायणदेखील करण्यात आले.

स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
नाशिक : श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंदिरे आणि केंद्रांवर भाविकांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने स्वामी चरित्राचे पारायणदेखील करण्यात आले. स्वामी जयंतीनिमित्ताने शहरातील काही स्वामी समर्थ मंदिरे तसेच दिंडोरीप्रणीत केंद्रावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून या केंद्रावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्रावर सामूहिक देवी सप्तशती पाठ आणि स्वामी चरित्राचे पारायण करण्यात आले. सकाळी व सायंकाळी आरतीलादेखील गर्दी होती. अखंड नामसंकीर्तनाचे करण्यात आले.