भाविकांची मेळा स्थानकावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:17 IST2017-08-07T00:17:02+5:302017-08-07T00:17:26+5:30
‘बम बम भोले’चा गजर करत शेकडो शिवभक्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रवाना झाले. यावर्षी तिसºया श्रावणी सोमवारी रक्षाबंधनाचा सण आल्याने, तसेच ग्रहण असल्यामुळे की काय मेळा बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी कमी जाणवत होती़

भाविकांची मेळा स्थानकावर गर्दी
नाशिक : ‘बम बम भोले’चा गजर करत शेकडो शिवभक्त त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी रवाना झाले. यावर्षी तिसºया श्रावणी सोमवारी रक्षाबंधनाचा सण आल्याने, तसेच ग्रहण असल्यामुळे की काय मेळा बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी कमी जाणवत होती़ राज्य परिवहन महामंडळाने भाविकांसाठी ठेवलेल्या बहुतांशी बसेसही बराच काळ भाविकांच्या प्रतीक्षेत उभ्या असल्याचे चित्र दिसून आले़ तिसºया श्रावणी सोमवारचे औचित्य साधत शिवभक्त त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्यासाठी रवाना होतात. यासाठी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते.
तिसºया श्रावणी सोमवारसाठी शहरातील शिवमंदिरे सज्ज झाली असून, गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिर, नारोशंकर, नीलकंठेश्वर, सोमेश्वर या मंदिरांमध्ये श्रावण सोमवारनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्रावण महिन्याच्या तिसºया सोमवारी मंदिरांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने मंदिर व्यवस्थापनाकडून विशेष काळजी घेतली जाते. तसेच मंदिरांवर विद्युत रोषणाई केली जाते.