अर्ज भरण्यासाठी गर्दी

By Admin | Updated: February 2, 2017 01:16 IST2017-02-02T01:16:17+5:302017-02-02T01:16:31+5:30

सिडको प्रभाग : आजपर्यंत १५ अर्ज दाखल

The crowd to fill the application | अर्ज भरण्यासाठी गर्दी

अर्ज भरण्यासाठी गर्दी

सिडको : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सिडको प्रभागातून आजपर्यंत १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आज विद्यमान नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस राहिल्याने इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरण्यात येत आहे.
मनपा निवडणुकीसाठी सिडको प्रभागात प्रभाग क्रमांक २५, २६, २७, २८, २९ व ३१ अशा सहा प्रभागांचा समावेश आहे. गेल्या (दि.२७) फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज सिडको प्रभागातून एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात प्रभाग २९(क) या सर्वसाधारण खुल्या गटातून विद्यमान नगरसेवक लक्ष्मण पंडितराव जायभावे यांनी व २९(ब) या सर्वसाधारण महिला गटातून मीरा अरविंद साबळे यांनी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केले. तर प्रभाग २९(ड) या सर्वसाधारण खुल्या गटातून रमेश रामजी उघडे यांनी शिवसेनेच्या वतीने व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच प्रभाग क्रमांक २९(ड) या सर्वसाधारण खुल्या गटातून नितीन जगन्नाथ माळी यांनी मनसेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर २८(अ) या नागरिकांच्या मागास प्रवर्ग या गटातून गणेश तानाजी मोरे यांनी मनसेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. (वार्ताहर)

Web Title: The crowd to fill the application