आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी
By Admin | Updated: July 15, 2016 23:56 IST2016-07-15T23:50:23+5:302016-07-15T23:56:32+5:30
आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी
त्र्यंबकेश्वर : पंढरपूर येथे आषाढीवारीनिमित्त पंढरपूरला
मोठी यात्रा भरली आहे. त्र्यंबकेश्वर येथेही आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे येऊन संत निवृत्तिनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता भाविक येतात. काही भाविक महिन्याच्या ‘वारी’वाले आहेत, अशा सर्वच लोकांची गर्दी वाढली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदीर, कुशावर्त तीर्थ व निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर या ठिकाणी भरपावसात वारकरी भाविकांची गर्दी दिसत असून, दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत तर कुशावर्तात स्नानासाठी गर्दी वाढली आहे.
एकादशीनिमित्त उपवास असल्याने फराळाच्या पदार्थ खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. यावर्षी रताळी ८० रु., खजूर ७० ते ८० रु., शेंगदाणा ९० रु. , साबुदाणा ६५ रु., तर गूळ ४० ते ४५ रु. भावाने विक्री होत आहेत. केळी देखील ३० रु. डझन विक्री होत आहे. (वार्ताहर)