भाविकांच्या गर्दीने फुलला उरूस : बडी दर्गा
By Admin | Updated: April 29, 2017 21:10 IST2017-04-29T21:10:25+5:302017-04-29T21:10:25+5:30
जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गामध्ये यात्रोत्सव (उरूस)

भाविकांच्या गर्दीने फुलला उरूस : बडी दर्गा
नाशिक : जुन्या नाशकातील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गामध्ये यात्रोत्सव (उरूस) मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे उरूस फुलला आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हुसेनी बाबा यांचा उरूस भरविला जातो. जुने नाशिकमधील ही एकमेव मोठी यात्रा मानली जाते. यात्रेनिमित्त सर्व धर्मीय भाविक या दर्ग्याला भेट देत आहेत. यानिमित्त दर्गा परिसरात मोठी गर्दी उसळत आहे. जुने नाशिकसह वडाळागाव, सिडको, सातपूर, इंदिरानगर, देवळालीगाव, विहितगाव आदि परिसरातून भाविक बडी दर्गामध्ये येत आहे. संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत यात्रोत्सव सुरू राहत आहे. या कालावधीमध्ये दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर भाविक यात्रेचा आनंद लुटताना दिसून येत आहे. या यात्रेचे आगळे वैशिष्ट म्हणजे ‘फालुदा’ हा शीतपेयाचा प्रकार. फालुदा विक्री करणाऱ्या नाशिकसह मुंबईहून विक्रेते या यात्रेत दाखल झाले आहेत. यावर्षी फालुद्याचे दरवाढ झाल्यामुळे भाविकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पहावयास मिळत आहे. रहाटपाळणे नेहमीप्रमणा सादिकशाह जलकुंभाजवळ लावण्यात आले आहे. संध्याकाळी शहीद अब्दूल हमीद चौकापासून बडी दर्ग्याकडे पिंजारघाटमार्गे आणि मुलतानपुऱ्यातून जोगवाडा मार्गावरील वाहतूक भद्रकाली पोलिसांकडून नियंत्रीत करण्यात येत आहे