शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

गणेशदर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:26 IST

नाशिक : गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे पाहण्यासाठी गुरुवारी (दि.२०) गणेशभक्तांची गर्दी उसळली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात परतीच्या पावसाचे आगमन झाले असून, दुपारपासूनच पावसाच्या धारा कोसळत असल्यामुळे गणेशभक्तांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघता आले नव्हते. परंतु, पावसाने गुरुवारी उघडीप दिल्याने आणि शासकीय ...

ठळक मुद्देउत्सवाला यात्रेचे स्वरूप : सामाजिक, सांस्कृ तिक देखाव्यांना नाशिककरांची पसंती

नाशिक : गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेश मंडळांनी साकारलेले सामाजिक आणि सांस्कृतिक देखावे पाहण्यासाठी गुरुवारी (दि.२०) गणेशभक्तांची गर्दी उसळली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात परतीच्या पावसाचे आगमन झाले असून, दुपारपासूनच पावसाच्या धारा कोसळत असल्यामुळे गणेशभक्तांना देखावे पाहण्यासाठी घराबाहेर निघता आले नव्हते. परंतु, पावसाने गुरुवारी उघडीप दिल्याने आणि शासकीय कार्यालये व शाळांना मुहर्रमनिमित्त सुट्टी असल्याने शहरात गणेशभक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक आणि धार्मिक विषयांसह काही राजकीय देखावे साकारले आहेत. रविवार कांरजा मित्रमंडळाने अष्टविनायक दर्शनाचा देखावा साकारला असून, सराफ बाजारात सुवर्णकार गणेशमूर्ती स्थापन केला असून, येथे विठ्ठल दर्शनाचा देखावा साकारण्यात आला आहे. मालेगाव स्टॅँडवर वारकरी देखावा साकारण्यात आला असून, कैलास मित्रमंडळाने जिवंत देखावा साकरला असून, पंचवटी कारंजा येथील कंस वधाचा देखावा, मेनरोडला चित्रपट व लोकगीतांवर झळकणारी लायटिंग, शालिमार येथील जय बजरंग मित्रमंडळाचा झाडूपालून बनवलेला गणपती, गवतापासून बनविलेला गणपती पाहण्यासाठीही गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. शहरातील रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, शालिमार, मेनरोड, मुंबई नाका, जुने नाशिक, पंचवटी या भागांसह बी. डी. भालेकर मैदानावरील पारंपरिक गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी दरवर्षी भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवात मात्र देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी हवी तशी दिसत नसल्याचे बुधवारपर्यंत दिसून येत होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही ही रुखरुख होती. मात्र, गुरुवारी पावसाने उघडीप दिल्याने आणि त्यातच शासकीय सुटीचा योगही जुळून आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गणपती दर्शन व देखावे पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दोन दिवसांपासून शहरात दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे भक्तांचा हिरमोड होत होता. रविवारी सुटी असूनही अनेकांच्या घरी महालक्ष्मी असल्याने भक्तांना देखावे पाहण्यासाठी जाता आले नाही. त्यामुळे इतर दिवशी सवडीप्रमाणे देखावे पाहण्यासाठी जाण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. परंतु दोन दिवसांच्या पावसाने त्यावर विरजन घातले. अखेर गुरुवारी पावसाने दिलेली उघडीप आणि शासकीय सुटीचा योग जुळून आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधान आल्याचे दिसून आले.काँग्रेस कमिटी टिकात्मक देखावानाशिक शहरात विविध गणेशोत्सव मंडळांना समाजिक व सांस्कृतिक देखावे उभारले असून काँग्रेस कमिटीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपतीचा देखावाही राजकीय स्वरूपाचा आहे. या देखाव्यातून विमानाने फिरणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवतानाच पेट्रोल डिझेलची दरवाट, नोटबंदी, महागाई आणि भ्रष्टाचाºया आगीत होरपाळणारा जनता दाखविण्यात आली आहे. गणेशोत्सवाला यात्रचे स्वरूप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहायला येणाºया गणेशभक्तांच्या गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हीच संधी साधत ठिकठिकाणी खाद्य पदार्थांची विक्र ी करणारे स्टॉल्स, फुगे, खेळणी विक्रे ते यांच्यासह विविध प्रकारच्या वस्तू विक्रेत्यांनी मोठ्या दुकाने लावली आहे. शहरातील मुंबई नाका, निमाणी, सिडकोतील राजीवनगर मैदान परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाºया भक्तांना रहाट पाळणे, गोलाकार फिरणाºया गाड्या, झोके, एअर बाउंसी आदी खेळण्यांही उपलब्ध असल्याने गणेशोत्वला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.