शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

जिल्ह्यात पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:13 IST

पाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळींंब बागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे.

ठळक मुद्देपाऊस : पाटणे परिसरात डाळींब बागांना झळ; येवला तालुक्यातील पिकांची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणे : परिसरात गेल्या तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डाळींंब बागांसह अन्य पिकांना झळ बसली आहे.मागील वर्षी डाळिंंबाचे अपेक्षित उत्पादन हाती लागले नाही. कारण मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बहार धरला. जून महिन्याच्या सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फुल गळ होऊन फळ धारणा अतिशय अल्प प्रमाणात झाली. परिणामी डाळिंंब बागा यशस्वी झाल्या नाहीत त्याचा फटका डाळिंंब उत्पादक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसला होता. यावर्षीही पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पुन्हा बागांची सेटिंग होताना शेतकºयांना खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागली. हजारो रुपये फवारणी, खतांसाठी खर्च करून जीवापाड जोपासलेल्या बागेत फळधारणा होऊन डाळिंब बागा बहरत असतानाच गेल्या तीन दिवसांच्या पावसामुळे बागेमध्ये दोन दोन फूट पाणी साचले आहे. पाण्याचा निचराही होत नसल्याने मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.फळगळ व फुलगळ तसेच डाळिंबाच्या झाडांचे नुकसान होत आहे. यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यत डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. या संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.डाळिंब उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी पाटणे येथील डाळिंंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत अहिरे, विजय हिरे, सोसायटीचे माजी चेअरमन हरिदास अहिरे, माजी सरपंच नथू खैरनार ,दादाजी खैरनार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास आहिरे , सुरेश रघुनाथ अहिरे, नानाजी शेवाळे, सुभाष अहिरे , नारायण खैरनार, कृष्णा आहिरे ,दशरथ खैरनार, शिवाजी खैरनार ,शरद खैरनार, शंकर खैरनार, दशरथ खैरनार, ईश्वर खैरनार, लालचंद खैरनार आदी शेतकºयांनी केली आहे.डोंगरगावी नुकसानमेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसराला पावसाने तीन दिवसांपासून झोडपून काढले असून, खरीप पिकांसह कोबी, टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगरगाव येथील गोकुळ सावंत, चिंतामण सावंत यांच्यासह अनेक शेतकºयांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने बाजरी, मका आणि भुईमूग आदी पिके खराब झाली आहेत. याशिवाय मेशी येथील भिका शिरसाठ यांच्या टमाटा व कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग दोन-तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा चाळीत पाणी घुसल्याने कांदा सडण्याची भीती आहे. महसूल विभागाने दखल घेऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. ओढे, नाल्यांचेही पाणी उभ्या पिकांमध्ये घुसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके सडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.पाटोदा परिसरातील गावांमध्ये हजारो एकर मका, बाजरी भुईसपाटपाटोदा : पाटोदा परिसरात शनिवारी, (दि. २५) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने परिसरातील पाच ते सहा गावांमधील हजारो हेक्टर मका व बाजरीचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी येत असलेला घास अस्मानी संकटाने हिरावला जात असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावरील उंट अळीने शेतकरी आधिच संकटात सापडला आहे. अळी नियंत्रणासाठी हजारो रु पयांची महागडी औषध व कीटकनाशके फवारणी करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांवर वादळी पावसाचे दुहेरी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.शनिवारी सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या जोरदार पावसाने पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, आडगावरेपाळ, विखरणी, पिंपरी, दहेगाव, सातारे, शिरसगाव, लौकी, निळखेडे, सोमठाणदेश, गुजरखेडे या भागातील मुख्य पिक असलेले मका, व बाजरीचे पिक आडवे होऊन पूर्णत: भुईसपाट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी