शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:10 IST

मेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसरात झालेल्या सलग दोन तीन दिवसांच्या पावसाने हाहाकार केला असुन खरीप पिकांसह कोबी, टोमॅटोचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : देवळा पूर्व भागातील डोंगरगाव, मेशीसह परिसरात झालेल्या सलग दोन तीन दिवसांच्या पावसाने हाहाकार केला असुन खरीप पिकांसह कोबी, टोमॅटोचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.डोंगरगाव येथील गोकुळ सावंत, चिंतामण सावंत यांच्यासह अनेक शेतकरी यांच्या शेतातील बाजरी, मका आणि भुईमूग आदी पिकांमध्ये गुढघाभर पाणी साचल्याने पिके खराब झाली आहेत. याशिवाय मेशी येथील भिका शिरसाठ यांच्या टोमॅटो व कोबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सलग दोन तीन वेळा झालेल्या या ढगफुटीसारख्या मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच कांदा चाळीत पाणी घुसले आहे.या पावसाने सगळे ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. या वर्षी अगदी जूनच्या आरंभापासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरीपाची पेरणी लवकर आटोपली होती, परिणामी पिके जोमात आहेत. परंतु या सगळ्या आनंदावर विरझण पसरेल कि काय असे चित्र निर्माण झाले आहे. काही पिके पावसाच्या पाण्याने उन्मळून गेली आहेत. त्यामुळे खरीप पिके वाया जाण्याची शक्यता आहे.महसूल विभागाने दखल घेऊन पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.

ओढे, नाल्यांचेही पाणी उभ्या पिकांमध्ये घुसले असल्याने पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे पिके सडण्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. अजूनही पावसाचे वातावरण आहेच त्यामुळे पावसाळी कांदा लागवडही लांबणीवर पडू लागली आहे, त्यामुळे कांद्याची रोपे खराब होत आहेत. चोहोबाजुंनी शेतकरी कोंडीत सापडला आहे. महागडी बियाणांची खरेदी करून पेरणी केली आहे. तसेच महागडी खते वापरली गेली आहेत यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस