जळगाव नेऊर : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२४ गावातीलतब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असुन यातील ३३ टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असुन सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आहेत पंचनामे झालेल्या पिकांमध्ये बाजरी २.१० तर, कापसाचे एक हजार ४९०हेक्टर,मका दोन हजार ३२८, भुईमुग ३.६० हेक्टर, तर सोयाबीनचे १११.९७ हेक्टर तर तीन हजार ९३६ हेक्टरवर जिरायती पिकांखालील नुकसान झाले असून,याचा फटका आठ हजार ३६० शेतकऱ्यांना तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांना बसला आहे. येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाल्याने सर्वाधीक नुकसान झाले असून, पंचनाम्यांनुसार २६ हजार ६४४ शेतकऱ्यांचे तब्बल १२ हजार ९१४ हेक्टरवरील कांद्याचे पंचनाम्यानुसार नुकसान झाले आहे तर १.८०हेक्टरवर भाजीपाल्याचे नुकसान होऊन कांदा आणि भाजीपाला मिळुन १७ कोटि ४३ नुकसान पंचनाम्यानुसार झाले आहे. तर फळपिकामध्ये अॅपल बोर २.४०, तर द्राक्षाचे १.८० असे दोन्ही मिळुन ४.२० हेक्टरवरील चार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन शासनाकडून काय मदत मिळते याकडे शेतकर्या़ंचे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यात पिक पंचनामे पुर्ण करण्यात आले असुन , माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली असून अनुदान प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल.- प्रमोद हिले, तहसीलदार येवला.मी साडेतीन एकरावर पोळ कांदा लागवड केली होती पण मुसळधार पावसाने व बुरशीजन्य रोगाने कांद्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागले .शासनाने मदतीचा हात पुढे करून लवकरात लवकर मदत घ्यावी.- खंडेराव चव्हाणके ,जळगाव नेऊर.
येवला तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:30 IST
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील १२४ गावातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असुन यातील ३३ टक्क्यांवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असुन सुमारे २० कोटी १२ लाखांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आहेत.
येवला तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
ठळक मुद्देप़ंचनामे पुर्ण .....३५ हजार शेतकऱ्यांची उभी पिके खराब