शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:34 IST

निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्दे ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना फटकाप्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसाननाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी अडचणीत

नाशिक: मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे  झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पीकाचे सर्वाधिक नुकसान झाले.      अरबी समुद्रात उठलेल्या निसर्ग चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतांनाच उत्तर महाराष्ट्राजवळून गेलेल्या चक्रीवादळाचा उद्रेक जिल्ह्यात झाला नसला तरी या चक्रीवादळच्या प्रभावामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळीवाऱ्याचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले.     वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या आधिकाऱ्यांनी केले असून प्राथमिक अहवालानुसानर ५१५ हेक्टरवरील पीकाचे नुकसान झाले असून मका, ऊस आणि फळपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा नाशिक, सिन्नर, निफाड आणि इगतपुरी तालुक्यांतील गावांना बसला सिन्नरमधील २३ गावांमध्ये पावसाने चांगलेच नुकसान केले. या तालुक्यातील ४६० शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले.  भरवशाचे मका पीक वाया गेले आहे. नाशिक तालुक्यातील २४ गावांमधील २३८ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे.      मालेगाव, सटाणा, नांदवाग, इगतपुरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये देखील काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७७६ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला यामध्ये सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या खोलाखाल नाशिक तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मका, ऊस आणि भाजीपाला तसेच फळपीकांचे या पावसाने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील एकुण स्थितीजिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांचे चक्रीवादळ आणि पावसाने नुकसान केले आहे. ७७६ शेतकऱ्यांच्या एकुण ५१५हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मका-२५६.६०, ऊस- ३१.६०, भाजीपाला- १४०.५०, फळपीके-४६.७० हेक्टर याप्रमाणे पीकांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी