क्र ांती पॅनलचा झेंडा

By Admin | Updated: April 20, 2016 00:28 IST2016-04-19T23:29:25+5:302016-04-20T00:28:35+5:30

मोहाडी ग्रामपालिका : समता पॅनलचा धुव्वा

Criteria panel flag | क्र ांती पॅनलचा झेंडा

क्र ांती पॅनलचा झेंडा

 दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव यांच्या क्रांती पॅनलने सतरा पैकी चौदा जागांवर विजय मिळवून ग्रामपालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवली. विरोधी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी यांच्या समता पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
गत पाच वर्षांत जिल्हा परिषद व ग्रामपालिकेच्या माध्यमातून प्रवीण जाधव व त्यांच्या ग्रामपालिका टीमने केलेले गावअंतर्गत रस्ते, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा, शेकडो वैयक्तिक स्वच्छतागृहांचेबांधकाम, स्त्रियांसाठीचे सार्वजनिक शौचालये,गावात हायमास्ट लाइट व्यवस्था, सुशोभित अंत्यविधी व दशक्रि या विधी शेड व परिसर, गावात सार्वजनिक कार्यक्र मासाठी दोन सभागृहे, प्रत्येक प्रभागात समाजमंदिर, व्यायामासाठी अद्यावत ग्रीन जीम व बगीचा, कानिफनाथ व हनुमान मंदिर बांधकाम, सर्व सुविधायुक्त आरोग्य केंद्र व शाळा, डिजिटल अंगणवाड्या, सांस्कृतिक विकासासाठी विविध कार्यक्र म व उद्बोधक व्याख्याने असा गावाला नवी दिशा दाखवणारा सर्वांगीण विकास मोहाडीकरांना भावल्याने त्यांनी शिवसेना पुरस्कृत क्र ांती पॅनलला भरभरून मतदान केले.
क्रांती पॅनलचे विजयी झालेले ुउमेदवार- अनिल बाबूराव जाधव (५६०), राजाराम धर्माजी जाधव (५५९), विमल मच्छिंद्र महाले (५३५), रवींद्र कृष्णराव जाधव (५३२), विनता विलास देशमुख (६९१), बाकेराव लक्ष्मण मौले (६६५), जिजाबाई शिवाजी नेहरे (४९९), कैलास वाळू कळमकर (४९३), अनिता बापूसाहेब पाटील (४९५), बाबा नाना निकम (५१७), उषा सिद्धार्थ निकम (३८३), रत्ना निवृत्ती क्षीरसागर (४३४), सुरेश तुळशीराम गावित (२६५), सीता कैलास जोपळे (२६८) आदिंचा समावेश आहे.
समता पॅनलचे विजयी उमेदवार- किरण पंढरीनाथ नाईक (५३५), शीतल प्रकाश माळी (५२९), सविता भाऊसाहेब पवार (४८८) विजयी झाले. विजयी उमेदवारांची गावातून ॅविजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यात लहान थोर, महिलांसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Criteria panel flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.