आयआरसीचे निकष : पादचाºयांना चालण्यासाठी असावी सुलभता कसे असावे आदर्श फुटपाथ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:18 IST2017-11-10T00:17:34+5:302017-11-10T00:18:35+5:30
रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क हा पादचाºयांचा असला तरी त्यांना प्रत्यक्षात असा हक्क मिळत नाही आणि रस्त्याच्या कडेला फुटपाथ म्हणजेच पादचारी मार्ग असले तरी त्याचा वापरही करता येत नाही.

आयआरसीचे निकष : पादचाºयांना चालण्यासाठी असावी सुलभता कसे असावे आदर्श फुटपाथ?
नाशिक : रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क हा पादचाºयांचा असला तरी त्यांना प्रत्यक्षात असा हक्क मिळत नाही आणि रस्त्याच्या कडेला फुटपाथ म्हणजेच पादचारी मार्ग असले तरी त्याचा वापरही करता येत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे जागतिक स्तरावरील फुटपाथची बदलती संकल्पना सोडाच, परंतु अगदी आयआरसी म्हणजेच नॅशनल रोड कॉँग्रेसच्या नियमांचेदेखील पालन होत नाही. त्यामुळे आदर्श फुटपाथ होतील तेव्हाच त्याचा वापर होऊ शकेल, असे दिसते.
शहराच्या वाढत्या विकासामुळे दिवसेंदिवस रस्त्यांची लांबी आणि प्रसंगी रुंदी वाढविण्याचे काम सातत्याने सुरू होत असते. सध्या नाशिक शहरात दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात कॉँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाबरोबरच खडीकरण असलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. त्यातील सुमारे २६५ किलोमीटरचे रस्ते खडीकरणाचे आहेत, हा भाग वगळला तर उर्वरित रस्त्यांवरही फुटपाथ मुळातच खूप कमी आहेत. विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे रुंद रस्ते विकसित करताना फुटपाथचे नियोजन करते, परंतु बºयाच वेळा ही एक औपचारिकता पार पडते. त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही. त्यामुळे आता आयआरसीचे निकष आणि जागतिक स्तरावर बदलते प्रवाह याचा विचार करून नव्या पद्धतीचे सर्वांना उपयुक्त असे पथदीप साकारण्याची गरज निर्माण झाली आहे.