शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:47 IST

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मध्यरात्री गस्त घालताना आढळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकला व रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. 

ठळक मुद्देपोलिसांच्या गस्तीपथकाकडून दोन सराईताना अटक सिनेस्टाईल पाठलाग करून आवळल्या मुसक्या

नाशिक : पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मध्यरात्री गस्त घालताना आढळलेल्या दोन सराईत गुन्हेगारांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे. पोलिसांनीअटक केलेल्या उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकला व रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या सोनसाखळी आणि घरफोड्या लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या सूचनांनुसार परिसरातील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, शुक्रवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास अहमद पटेल, प्रदीप सावंत हे दोघे कर्मचारी हॉटेल एक्स्प्रेस इनच्या पाठीमागील परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दोन संशयित आढळून आले. पोलीस कर्मचारी पटेल व सावंत यांनी संशयितांना विचारपूस करण्यासाठी थांबण्यास सांगितले, मात्र त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे पटेल आणि सावंत यांनी संशयितांचा पाठलाग करण्यास सुरुवात करून दोघांच्याही मुसक्या आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यातील एकजण अंबडच्या चुंचाळे परिसरातील घरकुल भागात राहणारा उद्धव अशोक राजगिरे ऊर्फ टकल्या (१९) असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खून, घरफोडीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याचा साथीदार सराईत रोशन रामदास पवार ऊर्फ नेम्या याच्यावरही घरफोडी, सोनसाखळी चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गस्ती पथकातील पोलीस कर्मचारी अहमद पटेल व प्रदीप सावंत या दोघांचाही पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकArrestअटकPoliceपोलिस