तडीपार गुन्हेगारांचे पंचवटीत वास्तव्य

By Admin | Updated: September 15, 2014 00:32 IST2014-09-14T01:01:17+5:302014-09-15T00:32:58+5:30

तडीपार गुन्हेगारांचे पंचवटीत वास्तव्य

The criminals live in Panchvati in Panchavati | तडीपार गुन्हेगारांचे पंचवटीत वास्तव्य

तडीपार गुन्हेगारांचे पंचवटीत वास्तव्य



पंचवटी : विविध गुन्हे दाखल असल्याच्या कारणावरून पंचवटी पोलिसांनी तडीपार केलेले संशयित पंचवटी परिसरातच वास्तव्य करीत असले, तरी पंचवटी पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचवटी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हाणामाऱ्या तसेच शरीराविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची दखल घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असलेल्या काहींना नाशिक शहरातून तडीपार केले खरे; मात्र तडीपार पुन्हा राहत असलेल्या परिसरातच वास्तव्य करीत असल्याने पंचवटी पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे. कोम्बिंग आॅपरेशन, आॅल आऊट, तसेच वाहन तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पोलिसांना गुन्हेगार शोधमोहिमेत तडीपार केलेले संशयित मिळून येत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. तडीपार मिळून आले तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो; मात्र न्यायालय त्यांची मुक्तता करते मग आम्ही काय करायचे, अशी मुक्ताफळेही पोलिसांकडून उधळली जातात. गुन्हे दाखल असलेल्या संशयितांना तडीपार करण्याचे काम पोलिसांनी केवळ कागदोपत्री पूर्ण केलेले असले, तरी तडीपार पुन्हा हद्दीतच असल्याबाबत माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस असमर्थता दाखवत असल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The criminals live in Panchvati in Panchavati