शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

गुन्हेगाराने पोलिसांच्या हातावर दिली तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:19 IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित अशोक दत्ता पारवे (२४) याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. पारवे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या.

नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित अशोक दत्ता पारवे (२४) याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. पारवे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांकडून संशयित गुन्हेगारांना निष्काळजीपणे जिल्हा रुग्णालयात आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाच्या वाहनातून (एम.एच.१५ अ‍े.अ‍े.१६२) संशयित अशोक यास दोन ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी एक पोलीस कर्मचारी कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ गेला व दुसºया पोलीस शिपायाने अशोक यास रुग्णालयात नेले. यावेळी त्याची नजर चुकवून अशोक रुग्णालयाबाहेर आला. त्याने शवविच्छेदन कक्षाच्या दिशेने पळ काढला. तेथील मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यामुळे तो पाठीमागील संरक्षक भिंतीवरून उडी मारून फरार झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संशयित गुन्हेगार फरार झाल्याचे समजताच बंदोबस्तावरील पोलिसांच्या पायाखालील वाळू सरकली. त्यांनी तत्काळ रुग्णालयाचा परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली व घटनेची माहिती बिनतारी संदेश यंत्रणेवरून नियंत्रण कक्ष व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिला. अवघ्या काही मिनिटांत न्याहाळदे, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील हे रुग्णालयात दाखल झाले.तत्काळ सर्व बीट मार्शल, पेट्रोलिंग वाहनांना सतर्कतेच्यासूचना देत त्याचे छायाचित्र पोलिसांच्या व्हॉट््सअ‍ॅपग्रुपवर व्हायरल के ले गेले.सरकारवाडा, मुंबईनाका पोलिसांचे गस्त पथक साध्या वेशातील पोलीस, बीट मार्शल सर्वांनी सीबीएस, पोलिसांची स्नेहबंधन पार्क वसाहत, टिळकवाडी, जुने मध्यवर्ती बसस्थानक, नवे मध्यवर्ती बसस्थानक, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान आदी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली; मात्र रात्री उशिरापर्यंत फरार अशोक पोलिसांच्या हाती लागला नाही.पुणे येथून केली होती अटकसंशयित अशोक विरोधात मुंबईनाका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा प्रथमदर्शनी दाखल होता. त्याने अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवून तिला पळवून नेले होते. त्याने मुलीसोबत लग्नही केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी त्यास पुणे येथून ताब्यात घेतले होते; मात्र तपासी पथकाच्या परिश्रमावर अखेर पाणी फिरले. वैद्यकीय तपासणीसाठी अशोकला आणले असता त्याने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी