शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
4
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
5
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
6
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
7
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
8
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
9
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
10
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
11
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
12
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
13
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
14
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
15
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
16
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
17
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
18
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
19
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
20
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी

पंचवटीतील तडीपार गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:15 IST

शहर व जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा) यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २४) पहाटे अटक केली़

नाशिक : शहर व जिल्ह्यातून काही महिन्यांपूर्वीच तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात वावरणारा सराईत गुन्हेगार श्यामसिंग महावीरसिंग परदेशी (४१, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, लामखेडे मळा) यास पंचवटी पोलिसांनी शुक्रवारी (दि़ २४) पहाटे अटक केली़  गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी परदेशी यास शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते़ न्यायालय वा पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी पहाटे त्यास घरातून ताब्यात घेतले़रिक्षाच्या प्रवासात ६२ हजारांचा मुद्देमाल लांबविलासातपूर शिंदे मळ्याजवळील रहिवासी आप्पासाहेब दिघे हे शुक्रवारी (दि़२४) कुटुंबीयांसह अशोकनगर ते ठक्कर बझार असा रिक्षाने प्रवास करीत होते़ या प्रवासादरम्यान रिक्षातील दोन संशयित महिलांनी त्यांच्या पत्नीच्या पर्समधील ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये दीड तोळा वजनाचा सोन्याचा नेकलेस, २० हजार रुपयांची सोन्याची पोत, १० हजार रुपयांच्या अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व बाळ्या, दोन हजार रुपयांची एक ग्रॅम वजनाची पोत यांचा समावेश आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.लॅपटॉपची चोरीआडगाव शिवारातील अमित सोनवणे (रा. शिवदर्शन अपार्टमेंट, जत्रा हॉटेलजवळ) यांचा २० हजार रुपयांचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप चोरट्यांनी आडगाव शिवारातील समर्थनगरमधील एका रेस्टॉरंटमधून चोरून नेला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या काही दिवसांपासून आडगाव परिसरात चोरीच्या प्रकार वाढल्याने भीतीचे वातावरण आहे.दानपेट्या फोडल्यापुणे महामार्गावरील साईशिवनगरच्या द्वारकामाई साई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ८०० रुपये व २०० रुपयांची पितळी थाळी चोरून नेली़ याबरोबरच या चोरट्यांनी डीजीपीनगरच्या टागोरनगरमधील साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून सहा हजारांची रोकड व सहा हजार रुपयांची दानपेटी असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ या प्रकरणी प्रकाश आवारे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा