शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

ड्रेनेजमध्ये आढळलेला मृतदेह गुन्हेगाराचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:21 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरावाडी परिसरातील गुंजाळबाबानगरमधील भुयारी गटारीच्या ड्रेनेजमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली आहे.

पंचवटी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरावाडी परिसरातील गुंजाळबाबानगरमधील भुयारी गटारीच्या ड्रेनेजमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली आहे. मृतदेह परिसरातील सराईत गुन्हेगार विकी उर्फ टेंबऱ्या भुजबळचा (२१) असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हेगारी गटातून विकीचा घात करण्यात आला की त्याचा अपघाताने ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झाला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.गेल्या मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिरावाडी गुंजाळबाबानगर परिसरात असलेल्या एका चेंबरजवळ कुत्री भुंकत असल्याने तेथे राहणाºया शरद गुंजाळ यांनी चेंबरकडे धाव घेतली असता त्या चेंबरमध्ये एक ३५ ते ४० वर्षे इसमाचा मृतदेह आढळून आल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर गुंजाळ यांनी याबाबत पंचवटी पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. बेवारस अवस्थेत आढळलेल्या मयताच्या हातावर विकी नाव गोंदलेले होते. चेंबरमध्ये पाण्यात मृतदेह पडून राहिल्याने मृतदेहाची ओळख पटविणे अवघड होते; मात्र हातावरील ‘विकी’ नावावरून अखेर पोलिसांनी मयताच्या माहिती घेण्यास सुरु वात केली असता सदरचा मृतदेह हा परिसरातील सराईत गुन्हेगार विकी भुजबळचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. भुजबळ याच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्याचा मृतदेह ओळखला असल्याचे पोलिसांनी सांगितले.मयत भुजबळ याच्या मृतदेहाचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यात काही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. भुजबळवर जबरी चोरी, घरफोडी, मोबाइलचोरीसारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस