जमावाच्या मारहाणीमुळे गुन्हेगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:48 IST2017-08-13T00:48:12+5:302017-08-13T00:48:17+5:30

Criminal death due to mob assault | जमावाच्या मारहाणीमुळे गुन्हेगाराचा मृत्यू

जमावाच्या मारहाणीमुळे गुन्हेगाराचा मृत्यू

नाशिक : पंचवटी अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाटाजवळ महिलेची छेड काढल्यामुळे नागरिकांनी दिलेला चोप व अतिमद्यपान यामुळे पंचवटीतील सराईत गुन्हेगार मोहन वसंत गवळी ऊर्फ मँगो काळ्या (वय २८, रा. गौरी पटांगण, गंगाघाट) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़११) मध्यरात्री घडली़ गवळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याच्या मृत्यूच्या कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे़
मॅँगो काळ्या याने शुक्रवारी सायंकाळी अतिमद्यसेवन केले होते़ अमरधामजवळील टाळकुटेश्वर घाट परिसरात त्याने एका महिलेची छेड केल्याने तेथील नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला़ यामध्ये मुक्का मार लागल्याने एका जागेवर पडलेल्या मँगो काळ्याबाबत काही नागरिकांनी १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन करून माहिती दिली़ त्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र अतिमद्यसेवन केल्याने होत असलेल्या उलट्यांमुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालयात शनिवारी मँगो काळ्याचे शवविच्छेदन करण्यात आले़

Web Title: Criminal death due to mob assault