शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगार चोथवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:41 IST

मखमलाबादरोड परिसरातील दाबेली विक्रेत्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागणारा पंचवटीतील सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेसह चौघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : मखमलाबादरोड परिसरातील दाबेली विक्रेत्यास पिस्तुलाचा धाक दाखवून दोन लाख रुपयांची खंडणी मागणारा पंचवटीतील सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवेसह चौघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वृंदावन कॉलनीतील रहिवासी अजय गरुड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ५ डिसेंबर २०१८ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास ते क्रांतीनगरहून मधुबन कॉलनीकडे जात होते़ संशयित तुकाराम चोथवे याने त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करून दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ यावर माझ्याकडे पैसे नाही, मी पैसे देणार नाही असे गरुड याने सांगितले असता चोथवे याने पुन्हा शिवीगाळ व मारहाण करून तुला जिवंत सोडणार नाही, तू परिसरात दिसायचे नाही, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल असून अजून एक गुन्हा दाखल झाल्यास मला फरक पडणार नाही, अशी धमकी दिली.या घटनेस तेरा दिवस उलटत नाही तोच १८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयित तुकाराम चोथवे, विकी भास्कर, पप्पू शेवरे व सुमित काळे हे सहकाऱ्यांसह लक्ष्मीपार्क येथे आले़ या सर्वांनी शिवीगाळ करून पुन्हा खंडणीची मागणी करून तुक्या भाईला पैसे दिले नाही तर तुझा काटा काढू अशी धमकी दिली़ यानंतर तुकाराम चोथवे याने पिस्तूल रोखून तू दरवर्षी शिर्डीला पायी जातो, तुला मित्रांच्या मदतीने ठार मारील, अशी धमकी दिली़  सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे व त्याच्या साथीदारांकडून मिळणाºया वारंवार खंडणी व जिवे मारण्याची धमकीस घाबरलेल्या गरुड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी