कसबे सुकेणे : येथे बुधवारी (दि.३०) कसबे सुकेणे पोलिसांनी मास्क न वापरणाºया वीस बेशिस्त नागरीकांवर गुन्हे दाखल केले असुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात येत आहे.निफाड तालुक्यातील ओझर, सुकेणे परिसरात कोरोना बाधित रु ग्ण संख्या सातत्याने वाढत असतांना काही बेशिस्त नागरीक मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने ओझर पोलिस ठाणे व कसबे सुकेणे पोलिस दुरक्षेत्र यांच्या वतीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी शहरातील मुख्य ओझर चौफुली, बसस्थानक, पोळा वेस याठिकाणी नाकेबंदी मास्क न वापरणाºया वीस नागरीकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.कसबे सुकेणे येथील पथकात वाहतुक शाखेसह पोलिस हवालदार कारभारी यादव, अरु ण गायकवाड, भास्कर पवार, दिलीप बोरसे, बापु आहेर, अमोल सुर्यवंशी, नितीन तेलंगण, बंडू हेगडे यांचा सहभाग होता. कसबे सुकेणेकरांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करु नये, ग्रामपालिका व आरोग्य प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनंजय भंडारे यांनी केले आहे.
मास्क न वापरणाऱ्या २० नागरीकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 18:23 IST
कसबे सुकेणे : येथे बुधवारी (दि.३०) कसबे सुकेणे पोलिसांनी मास्क न वापरणाºया वीस बेशिस्त नागरीकांवर गुन्हे दाखल केले असुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात येत आहे.
मास्क न वापरणाऱ्या २० नागरीकांवर गुन्हे दाखल
ठळक मुद्देकसबे सुकेणे : नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई