नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्नधान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून, रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे, तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करताना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून, निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे. राज्याच्या नागपूर विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १८ रेशन दुकानांचे निलंबन, तर एक दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती विभागात पाच गुन्हे नोंदविण्यात आले असून, सात रेशन दुकानांचे निलंबन आणि १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून, ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले, तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७, तर नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी सात रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर पुणे विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १७ रेशन दुकानांचे निलंबन व १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून, सात रेशन दुकानांचे निलंबन व एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे :छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 19:42 IST
नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, नऊ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले, तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी तीन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे :छगन भुजबळ
ठळक मुद्दे राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे कारवाईत ८७ रेशन दुकानांचे निलंबन४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द