चारचाकी विक्री बनावप्रकरणी तिघांवर गुन्हा

By Admin | Updated: May 25, 2014 16:28 IST2014-05-24T19:45:10+5:302014-05-25T16:28:21+5:30

साडेसोळा लाखांची फ सवणूक

The crime of selling four-wheelers | चारचाकी विक्री बनावप्रकरणी तिघांवर गुन्हा

चारचाकी विक्री बनावप्रकरणी तिघांवर गुन्हा

साडेसोळा लाखांची फ सवणूक
नाशिक : गाडीची विक्री करण्याचा बनाव करत १६ लाख ५० हजार रुपयांची फ सवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत नाशिकरोडच्या मोटवाणीरोड येथील रहिवासी मनोज विष्णू डबराणी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ यावरून संशयित अमोल देवंेद्र सिंग (रा़ ठाणे), पंकज सुरेश शेलार (भगूर) व बलराज सिंग (देवळाली कॅम्प) या तिघांवर फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या तिघांनी टोयोटा फ ॉर्च्युनर गाडीचा (क्र.एमएच १२, एचझेड १२६) डबराणी यांच्याशी आरटीजीएस स्वरूपाने व्यवहार करून १६ लाख ५० हजार रुपये रक्कम घेऊन तात्पुरत्या स्वरूपात गाडी दिली व कागदपत्रे नंतर देतो, असे सांगितले होते़ तर कागदपत्रे मिळत नाहीत, असे सांगून गाडी घेऊन गेले़ परंतु रक्कम परत न केल्यामुळे डबराणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़

Web Title: The crime of selling four-wheelers