शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! भावाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:58 IST

नाशिक - नंदुरबार जिल्ह्यातील संशयित नितीन सखाराम पाटील (५४, रा. आमलाड, ता. ताडोदा) याने इंदिरानगर भागातील एका महिलेला तिच्या भावाला ...

नाशिक - नंदुरबार जिल्ह्यातील संशयित नितीन सखाराम पाटील (५४, रा. आमलाड, ता. ताडोदा) याने इंदिरानगर भागातील एका महिलेला तिच्या भावाला नोकरीला लावून देण्याचे तसेच महिलेसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मागील वर्षात २५ जुलै ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. महिलेला तिची फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने इंदिरानगर पोलीस ठाण्यात नितीन पाटील याच्यासह अन्य सहा संशयितांविरोधात फिर्याद दिली, त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पाटील याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविण्यासोबतच तिच्या भावाला चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केली. याविषयीची सर्व वस्तुस्थिती संशयिताचे नातेवाईक अलका नितीन पाटील (४९, रा. आमलाड) यांच्यासह सतीश भगवान पाटील, सुवर्णा सतीश पाटील (रा. प्रकाशा, ता. शहादा), छोटूलाल दामू पाटील (रा. परिवर्धा, ता. शहादा), वसंत पाटील (रा. वेलदा, ता. निजर), वंदना तोरवणे (रा. कल्याणी बालसदन, ताडोदा) यांना माहिती असूनही त्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे पीडित महिलेने तिच्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सातही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक उघडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक