शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! तंबाखू न दिल्याने डोक्यात टाकला दगड; काका पुतण्याला स्टम्पने केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:44 IST

नाशिकरोड - परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार वाढतच आहे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी काका-पुतण्याला स्टम्पने मारहाण केली तर रेल्वे पुलाजवळ पैशाची ...

नाशिकरोड - परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रकार वाढतच आहे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी काका-पुतण्याला स्टम्पने मारहाण केली तर रेल्वे पुलाजवळ पैशाची मागणी करत एकाने चाकूने इसमावर वार केल्याची घटना घडली. पुतण्याला मारहाण करणाऱ्या युवकाला विचारणा करण्यास गेलेल्या काकांना दोघा जणांनी स्टम्पने बेदम मारहाण करून मनगट फ्रॅक्चर केले.

आगर टाकळी, समतानगर येथील प्रवीण ढमाजी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा पुतण्या जयेशला संशयित नितीन अरुण गांगुर्डे, विक्रांत अनिल गांगुर्डे (समतानगर, टाकळी) हे मारहाण करत होते. सोनवणे यांनी पुतण्याला मारहाण का करता, असे विचारले असता त्याचा राग धरत या दोघांनी त्यांनाही स्टम्पने मारहाण करून मनगट फ्रॅक्चर केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूहल्ल्यात युवक जखमी

चेहेडी पंपिग येथून देवळाली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ इसमाला पैसे दिले नाही म्हणून मारहाण करून अज्ञात युवकाने पोटावर व डोक्यावर चाकूने वार करून जखमी केले.

विनोद पोपा वाघेला हा शुक्रवारी रात्री सव्वासातच्या सुमारास देवळालीगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील पाण्याच्या टाकीजवळून दुकानात सामान घेण्यास जात होता.यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडे पैसे मागितले. वाघेलाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्या इसमाने लाथाबुक्याने मारहाण करून पोटावर व डोक्यात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तंबाखू न दिल्याने युवकास मारहाण

जेलरोडच्या इंगळेनगर येथे दोघे मित्र गप्पा मारत असताना तंबाखू दिला नाही म्हणून तिघा जणांनी युवकाला मारहाण करून डोक्यात दगड मारून दुखापत केली.

जेलरोड येथील अजय दिलीप राठोड याने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश गायकवाड याच्यासोबत ते गप्पा मारत होतो. यावेळी संशयित बाबा शाहा, बबन तांबे (जेलरोड, कॅनलरोड झोपडपट्टी) व त्यांचा एक साथीदार यांनी अजयकडे तंबाखू मागितली. अजयने नकार दिल्याने तिघा संशयितांनी अजयला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकला.''तुझा बेत पाहतो'' असा दम दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी