शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

क्राईम डायरी : इंदिरानगरला पादचारी वृध्देची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:16 IST

नाशिक : कलानगर चौकातून सराफनगरकडे पायी आपल्या पतीसोबत जात असलेल्या एका ६०वर्षीय वृध्देच्या गळ्यातील १०ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून ...

ठळक मुद्दे२५हजार रूपये किंमतीची सोनसाखळी काकाकडून अल्पवयीन पुतणीचा विनयभंगविवाहचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

नाशिक : कलानगर चौकातून सराफनगरकडे पायी आपल्या पतीसोबत जात असलेल्या एका ६०वर्षीय वृध्देच्या गळ्यातील १०ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.शोभा रमेश घुले (रा.सराफनगर लेन-१) या मंगळवारी (दि.१८) कलानगरकडून पायी सराफनगरकडे पतीसोबत जात होत्या. यावेळी सिंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमाकं २च्या समोर विरूध्द दिशेने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मंगळसुत्र खेचले. यानंतर घुले दाम्पत्याने आरडाओरड केली असता नागरिक जमले, मात्र तोपर्यंत चोरटा दुचाकीवरून सुसाट फरार झालेला होता. घटनेची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच त्वरित पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र त्यांच्याही हाती उशिरापर्यंत चोरटा लागलेला नव्हता. पोलिसांनी घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक जगदाळे हे करीत आहेत.काकाकडून अल्पवयीन पुतणीचा विनयभंगनाशिक : अश्लील चित्रफीती वारंवार आपल्या अल्पवयीन पुतणीला दाखवून तिचा विनयभंग करणाऱ्या संशयित काकाविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिडकोतील सिंहस्थनगर परिसरात राहणाºया एका काकाविरूध्द पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, पिडितेचा नात्याने काका असलेल्या संशयिताकडून २०१५ फेब्रुवारीपासून आपल्या अल्पवयीन पुतणीला वारंवार अश्लील चित्रफिती मोबाईल घरातील टीव्हीवर जोडून दाखवत होता. मात्र पिडिता लहान असल्याने ती घाबरून याबाबत कोणालाही सांगत नव्हती. अखेर तिने धाडस करून काकूकडे ही बाब सांगितली असता काकूने तिला गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने आपल्या आईकडे ही बाब बोलून दाखविली. आईने तत्काळ पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला असता पोलिसांनी संशयित काकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

विवाहचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचारनाशिक : विवाहचे आमिष दाखवून मागील तीन वर्षापासून पिडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.पाथर्डीफाटा येथील अमृतपार्कमध्ये राहणारा संशयित आरोपी सागर राजेंद्र खताळ याने पीडितेसोबत मैत्री करून नंतर प्रेम करत विवाहचे आमीष दाखविले. हे दोघेही तीन वर्षांपुर्वी एकमेकांचे शेजारी होते. पिडितेने सागरवर विश्वास दाखविला. त्याचा गैरफायदा घेत त्याने मागील तीन वर्षांपासून पिडितेवर वारंवार अत्याचार केले, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता संशियत आरोपी खताळ याने तिला मारहाण केली. यानंतर पिडितेने इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन करत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सागरविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

टॅग्स :Robberyचोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी