नाशिक : द्वारका परिसरातील संत कबीरनगर झोपडपट्टीजवळील मोकळ्या जागेवरील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ याठिकाणी बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे सात हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़सोमवारी रात्रीच्या सुमारास जलाल बाबा दर्ग्याजवळील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली़ त्यांनी या ठिकाणी छापा टाकला असता संशयित महेश गायकवाड, अजय वारडे, स्वप्नील गतीर (तिघेही रा़संजयनगर, नाशिक), रमेश सापटे (रा़बजरंगवाडी), सतीश कलाल (रा़पखालरोड), इमरान शाहीन (राक़ाजीपुरा), नाझीम शेख (रा़बागवानपुरा), मकसूर पठाण (राक़थडा), मंगेश भोये (रा़भारतनगर), मोहमंद शेख (रा़वैद्यनगर), रामदास गेलेये (रा़ पुणेरोड), इदरीस शेख (रा़निफाड) हे जुगार खेळताना आढळून आले़ या संशयितांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून सात हजार ९२० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कारवाई करण्यात केली़ (प्रतिनिधी)
द्वारका परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा
By admin | Updated: August 11, 2015 23:54 IST