विद्युत खाबांस धडक देणाऱ्या महिलेवर गुन्हा
By Admin | Updated: March 27, 2017 19:16 IST2017-03-27T19:16:26+5:302017-03-27T19:16:26+5:30
विद्युत खांबास धडक देऊन नुकसान करणाऱ्या भरधाव कारचालक महिलेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

विद्युत खाबांस धडक देणाऱ्या महिलेवर गुन्हा
नाशिक : विद्युत खांबास धडक देऊन नुकसान करणाऱ्या भरधाव कारचालक महिलेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या कारचालक महिलेचे नाव पूजा दिनकर पाटील (रा.नरसिंह अपा. गंगापूररोड) असे आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि़२५) रात्री १० वाजेच्या सुमारास पूजा पाटील या कारचालक (एमएच ०३ डब्ल्यू ७०४८) महिलेने शरणपूर रोडने भरधाव कार चालवल्याने ती तिबेटीयन मार्केट येथील सार्वजनिक विद्युत खांबावर जाऊन धडकली़ यामध्ये विजेचा खांब कोसळून मोठे नुकसान झाले होते़ या प्रकरणी पोलीस शिपाई संगम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे