ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड करणाऱ्याविरूध्द गुन्हा
By Admin | Updated: June 17, 2014 00:14 IST2014-06-16T23:42:41+5:302014-06-17T00:14:09+5:30
तोडफोड करणाऱ्याविरूध्द गुन्हा

ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड करणाऱ्याविरूध्द गुन्हा
सटाणा : हिराई ग्रामपंचायत कार्यालयात घरकुल योजनेबाबत चौकशी करताना झालेल्या बाचाबाचीनंतर आप्पा जगताप यांनी दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी जगताप यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन घरकूल योजनेबाबत पुढील कार्यवाहीची विचारणा केली. कार्यालयात उपस्थित स्वप्निल अहिरे, विठोबा गायकवाड, भारत आहिरे, राहुल पानपाटील आदी कर्मचाऱ्याशी जगताप यांची शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर जगताप याने कार्यालयाची तोडफोड केली तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. जगताप यांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीसांनी जगताप यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस हवलदार खालकर करत आहे.