गोदावरी नदीपात्रात वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हे

By Admin | Updated: April 19, 2017 17:40 IST2017-04-19T17:40:56+5:302017-04-19T17:40:56+5:30

गोदावरी नदीपात्रात वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हे

Crime against the thieves in Godavari river bank | गोदावरी नदीपात्रात वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हे

गोदावरी नदीपात्रात वाळू चोरणाऱ्यांवर गुन्हे

नाशिक : विनापरवाना गोदावरी नदीपात्रातून वाळू काढणाऱ्या संशयितांविरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांनी सुमारे बारा हजार रुपयांची वाळू साठवून ठेवली होती़
गोदापात्रातील गौरी पटांगणावरील मरीमाता मंदिरालगत संशयितांकडून सर्रासपणे वाळू उपसा केला जातो़ यानंतर उपसा केलेली वाळूही याच ठिकाणी विक्री केली जाते़ यापूर्वी पोलीस या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करीत नव्हते़ मात्र मंगळवारी पोलिसांनी अचानक गोदापात्रातून वाळू काढणारे राजेश मोहिते, प्रभाकर गायकवाड, अंबादास गायकवाड, हरिदास मोहिते, मल्लू पवार, चंद्रकांत गायकवाड, तानाजी अष्टेकर, दशरथ खरात, भानुदास पवार व संतोष पवार या संशयितांवर गुन्हे दाखल केले़
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात असून, ही कारवाई कायम सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Crime against the thieves in Godavari river bank