मालेगावी लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:39 IST2020-04-02T22:38:51+5:302020-04-02T22:39:05+5:30
मालेगाव शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

मालेगावी लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध गुन्हा
मालेगावी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात येत असलेले सीसीटीव्ही.
मालेगाव मध्य : शहरात लॉकडाउनचे उल्लंघन करणाºया ३८ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात ५० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली; मात्र काही व्यावसायिकांकडून छुप्या पद्धतीने दुकाने चालविण्यात येत आहेत. याची दखल घेऊन शहर पोलिसांनी आजपर्यंत ३८ अस्थापना चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले. संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व रस्त्यावर मोकाट फिरणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनसह मुख्य चौक व रस्त्यांवर ५० सीसीटीव्ही लावण्यात आले. संचारबंदी मोडीत काढणाºयांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी दिली.
मालेगाव शहरवासियांनी शब-ए-बारातसाठी आपल्या घरीच राहून पूर्वजांकरिता दुआपठण करावी, त्यासाठी कब्रस्तानात जाऊ नये असे आवाहन सर्व कब्रस्तानच्या ट्रस्टींनी केले आहे. शहरातील जनतेने स्वत:ला या गंभीर व संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्याकरिता शासनाने पारित केलेले आदेश पाळावेत, कुणीही घराबाहेर पडू नये, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.